मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (18:20 IST)

पालघर आश्रम शाळेतील 300 हुन अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

More than 300 students of Palghar Ashram School food poisoning
डहाणू अंतर्गत आश्रमशाळेतील 300 हुन अधिक विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आदिवासी विकास विभागाकडून आश्रम शाळा चालवल्या जातात. 
डहाणू प्रकल्प कार्यालय अंतर्गत 37 आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल शाळा आहे. या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्न पुरवठा केला जातो. मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून दररोज दोन वेळेचे जेवण आणि अल्पोहार पुरवला जातो. 

सोमवारी रात्री विद्यार्थ्यांना जेवण्यात मूग डाळ, दुधीची भाजी चपाती आणि भात देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केले आणि खंबाळे, नानिवली, खंबाळे, तांदुळवाडी, नंडोरे आणि इतर 11 आश्रमशाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी उठल्यावर उलट्या, पोटदुखी, जुलाब आणि मळमळ सारखा त्रास सुरु झाला.

त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले असून आरोग्य विभागाकडून सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि विद्यार्थ्यांसाठी जेवण पुरवणाऱ्या आणि बनवणाऱ्या  मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अन्न व औषध विभागाचे निरीक्षक आणि पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकांनी सोमवारच्या रात्रीचे जेवण्याचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार आहे. 
Edited by - Priya Dixit