1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (12:23 IST)

आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर मार्चपर्यंत बंदी

mumbai police
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1 मार्चपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरियल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
 
मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 188 भा.दं.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.