1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (08:24 IST)

नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी

Nawab Malik to be remanded in ED custody till March 3
महाविकास आघाडी सरकारमधल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ) यांना तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर  ईडीने (ED) अटक केली आहे. यानंतर नवाब मलिक यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सेशन कोर्टात  हजर करण्यात आलं. 54 नंबरच्या कोर्टात नवाब मलिक यांना हजर करण्यात आलं. ईडीकडून (ED) अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला. ईडीने नवाब मलिक यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. सेशन कोर्टात तब्बल अडीच तास दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद झाला. यानंतर सेशन कोर्टाने नवाब मलिक  यांना 3 मार्चपर्यंत  ईडी कोठडी सुनावली आहे.
 
नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकिल अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. ही घटना २००३ पूर्वीची आहे. तेव्हा PMLA कायदा अस्तित्वात नव्हता, तेव्हा कारावाई का करण्यात आली नाही असा मुद्दा अॅड. अमित देसाई यांनी उपस्थित केला. अचानक 20 वर्षांनी अटक करुन तपास यंत्रणा १४ दिवसांची कोठडी कशी मागू शकत, असा युक्तीवाद अॅड. अमित देसाई यांनी केला.