शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (09:18 IST)

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा कुर्ल्यात अपघात

nawab malik
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांचा मुंबईमधील कुर्ला येथे कार अपघात झाला तसेच या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहे. 
 
मुंबई पोलिसांनी सांगितले की, नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयात नियमित तपासणी करून परतत होते. ते कारमध्ये बसले असताना कार चालकाने चुकून ॲक्सिलेटर दाबल्याने कार भिंतीवर आदळली.
 
मिळालेल्या माहितीनुसार चालकाने चुकून ॲक्सिलेटर दाबल्याने कार भिंतीवर आदळली. व समीर खान हे गंभीर जखमी झाले. अशी पोलिसांनी माहिती दिली
 
मुंबई पोलिसांनी सांगितले की, नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयात नियमित तपासणी करून परतत होते. ते कारमध्ये बसले असताना कार चालकाने चुकून ॲक्सिलेटर दाबल्याने कार भिंतीवर आदळली. समीर खानच्या डोक्याला दुखापत झाली असून ते सध्या आयसीयूमध्ये आहे.

Edited By- Dhanashri Naik