1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2020 (08:07 IST)

आता कल्याण-डोंबिवलीतही दहा दिवसांचा लॉकडाऊन

ten-day lockdown
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. सोबतच मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन व्यवस्था देखील अपुरी पडत असून स्थानिक आमदाराकडून कडक लॉकडाऊनची सातत्याने मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात संपूर्ण दहा दिवसांचा लॉकडाऊन २ जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या काळात जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरू राहणार असली तरी या विक्रेत्यांना काऊंटर सेलची परवानगी दिली जाणार नसून घरपोच सेवा द्यावी लागणार आहे. इतर सरकारी कार्यालये कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू ठेवून सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करण्याची अट ठेवण्यात आली असून अत्यावश्यक सेवा नसलेली कार्यालये आणि अस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात महामारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.