शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:24 IST)

समीर वानखेडेंवरील विविध आरोपांवर पत्नी क्रांती म्हणाली…..

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकरी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. समीर यांच्यावर होणाऱ्या विविध आरोपांची दखल त्यांच्या पत्नीनेही घेतली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर ही समीर यांची पत्नी आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपांना क्रांतीने उत्तर दिले आहे. क्रांतीने लग्नाचे फोटोच शेअर केले आहेत. तसेच, त्यात म्हटले आहे की, मी आणि पती समीर आम्ही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही धर्म परिवर्तन केले नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीर यांचे पती हे हिंदू असले तरी त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केले. समीर यांनी २०१६ मध्ये रितसर पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर आम्ही २०१७ मध्ये विवाह बद्ध झालो, असे क्रांतीने स्पष्ट केले आहे. परिणामी, क्रांतीने मलिक यांच्या विविध आरोपांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे.दरम्यान, आपल्यावर होणाऱ्या विविध आरोपांना आपण आता थेट न्यायालयात उत्तर देणार असल्याचे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.