सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (11:44 IST)

वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने राज्यपालांच्या कार्यक्रमात वीज पुरवठा खंडित

Bhagat Singh Koshyari
महावितरण वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने आज सकाळी अंबरनाथ बदलापूर, ठाणे शहरात आणि मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. याचा प्रभाव राज्यपालांच्या कार्यक्रमावर देखील झाला. या दरम्यान मुंबईतील शिवाजी पार्क येथे स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा समारंभात वीज पुरवठा खंडित झाला. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास स्काऊट गाईड पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाला. मात्र या कार्यक्रमाच्या सुरु होण्यापूर्वीच वीज पुरवठा खंडित झाला.
 
उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर भागात वीज पुरवठा खंडित झाला. महावितरण विभागाचे अधिकारी वीज पुरवठा लवकरच सुरळीत व्हावा या कडे लक्ष देत आहे. त्यासाठी महापारेषण विभागाकडून उपकेंद्र सुधारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. काही भागात वीज पुरवठा सुरळीत सुरू झाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.