1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (15:35 IST)

राज ठाकरे यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Raj Thackeray discharged from hospital
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांनी ट्वीट करून माहिती दिली. टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. याआधी ही शस्त्रक्रिया कोरोना झाल्याने पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 
 
राज ठाकरेंनी ट्वीट करत काय म्हटले
 
'आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. काही वेळापूर्वी रुग्णालयातून बाहेर पडून घरी पोहोचलो. आपले आशीर्वाद आणि आणि प्रेम असेच कायम असो!'