राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो”
मुंबईत राहणाऱ्या काही पोलिसांवर राहती घर रिकामी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळेच पोलिसांच्या पत्नींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांच्या पत्नींना धीर देत वरिष्ठांशी बोलण्याचे आश्वासन दिले. राहती घर रिकामी करण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबियांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव आणला जातोय. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. “तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो” असे राज ठाकरेंनी पोलिसांच्या पत्नींना आश्वासन दिले.
राहती घरं रिकामी करण्यासाठी पोलिस कुटुंबीयांवर दबाव आणणा-या वरिष्ठ अधिका-यांच्या विरोधात, पोलिस कर्मचाऱ्यांच्या गृहिणी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर. तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो”; राजसाहेबांनी पोलिस गृहिणींना आश्वस्त केलं.