सर्वेक्षण अहवाल सांगतो, इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात ॲन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक

mask
Last Modified शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (12:01 IST)
मुंबईमध्ये ‘सार्स-कोव्हिड-2’ संदर्भात ॲन्टीबॉडीज सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीचा अहवाल आला आहे . या अहवालानुसार इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात ॲन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे

मुंबईमध्ये ‘सार्स-कोव्हिड-2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत.

भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ॲन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार नमुने संकलित करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोव्हिड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली

संबंधित सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुसऱ्या फेरी अंतर्गत 5 हजार 840 एवढ्या लक्ष्य नमुन्यांपैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होते.
सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीदरम्यान आढळून आलेली महत्वाची निरीक्षणे

पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले होते की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्तातील प्रतिद्रव्याचे प्राबल्य आढळून आले आहे.

दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिद्रव्याचे प्राबल्य आढळून आले आहे.
सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये ॲन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते. तर दुसऱ्या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे.

सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सरासरी 27 टक्के एवढे ॲन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

COVID-19 Vaccination: कमकुवत इम्यूनिटी असणार्‍या लोकांनी ...

COVID-19 Vaccination: कमकुवत इम्यूनिटी असणार्‍या लोकांनी कोवाक्सिनचा डोस अजिबात घेऊ नका - भारत बायोटेकने फॅक्टशीट प्रसिद्ध केले
Covid Vaccine Update: बरेच लोक भारत बायोटेकच्या औषध नियंत्रक ऑफ इंडिया कोव्हॅक्सिन 19 लस ...

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लहान मुले गायब होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आता या ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती कायम
उत्तरेकडून येणारे वाऱ्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने ...

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात
मुंबईसह राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 'कोविन' अॅपमधील बिघाडामुळे ...

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ...