शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (12:55 IST)

'मातोश्री' बाहेर शिवसैनिकाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

matoshree uddhav
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर येत आहे. अशातच एका शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भगवान काळे असं या शिवसैनिकाचं नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. भगवान काळे हे वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना स्वत:च्या गाडीतून मातोश्रीवर घेऊन गेले. तेथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते बैठकीसाठी आत गेले नाहीत. काही शिवसैनिकांनी दिलेल्या माहितीनूसार काळे हे तेथे पोहचताच त्यांना घाम येऊ लागला आणि त्यामुळे ते बाहेर एका खुर्चीतच बसले.
 
त्यानंतर काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. आज (गुरुवार) सकाळी राहात्या घरी कसारा गावी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काळे यांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे.