1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:32 IST)

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे मैदानात उतरणार

Thackeray government's headache will increase! MNS will take the field in the agitation of ST workers ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे मैदानात उतरणारMaharashtra News Mumbai News in Webdunia Marathi
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावं या मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे (ST हत्यार उपसले आहे. 29 ऑक्टोबर रोजी औद्योगिक न्यायालयाने  कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आदेश दिले होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरुच ठेवला आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासोबत अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले होत. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे.
 
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रक काढून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.या पत्रात म्हलटंय की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात (ST Workers Agitation) महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे 30 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

तसेच एसटी कामगार जगला तरच एसटी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे.त्यामुळे या पत्राद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. अशी राज ठाकरे यांचे आदेश आहेत, असे मनसे नेते बाळानांदगावर यांनी म्हटले आहे.