शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (10:35 IST)

वाघोबा घाटात बस 25 फूट खोल दरीत कोसळली

The bus crashed into a 25 feet deep ravine in Waghoba Ghat वाघोबा घाटात बस 25 फूट खोल दरीत कोसळली
पालघरच्या वाघोबा घाटात एसटी महामंडळाची रातराणी बसचा अपघात होऊन बस  25 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 15 ते 20  जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ही भुसावळ ते बोईसर मार्गावरील ही एसटी बस पालघरच्या वाघोबा घाटाच्या दरीत कोसळली.

बस चालकाने मद्यपान केलेले असून वेगाने गाडी चालवण्याच्या नादात पालघरच्या आधीच वाघोबा घाटात सकाळी 6 वाजेच्या सुमारास बस दरीत कोसळली. वाहकाला सांगत होतो की  चालकाचा हाती बस देऊ नका त्याने मद्यपान केलं आहे. तरीही बस वाहकाने आमचे ऐकून घेतले नाही. आणि हा अपघात झाला. असे बस मधील प्रवाशांचे  म्हणणे आहे. रातराणी बस सेवे अंतर्गत चालवणाऱ्या या बसचालकाला नाशिक मध्ये बदलण्यात आले. या अपघातात 15 ते 20 प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना पालघरच्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.