मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा 20 हजारांच्या वर
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. शहरात कोरोनाचा स्फोट झाला आहे. मुंबईत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत 5 हजारांनी वाढ झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा 20 हजारांच्या वर गेला आहे. तसेच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 20 हजार 181 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर धारावीत 117 कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसह महापालिकेच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. धारावीत 107 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील आतापर्यंतचा दैनंदिन रूग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. धारावीत सक्रिय रूग्ण संख्या 444 इतकी आहे.