सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (16:09 IST)

महिलेला ऑनलाईन पिझ्झा पडला 11 लाखांचा

The woman got an online pizza worth Rs 11 lakh महिलेला ऑनलाईन पिझ्झा पडला 11 लाखांचा Marathi Mumbai News  In Webdunia Marathi
सध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन सायबर फ्रॉडचे प्रकरण अधिकच झाले आहे. ऑनलाईन फ्रॉड करून हे सायबर गुन्हेगार सामान्य आणि भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून गेल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग करण्याचे प्रस्त वाढले आहे. ऑनलाईन वरून ऑर्डर केल्यावर पाहिजे ती वस्तू मिळविता येते. एका वृद्ध महिलेला ऑनलाईन पिझ्झा मागविणे महागात पडले. या वृद्ध महिलेची फसवणूक होऊन तिच्या बँकेच्या अकाउंट मधून 11 लाख निघाले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी भागात राहणाऱ्या या वृद्ध महिलेने ऑनलाईन पिझ्झा आणि ड्रायफ्रूट्सची ऑर्डर केली असताना चुकून तिने जास्तीचे पैसे दिले होते. या महिलेने पैसे परत मिळविण्यासाठी गुगल वर सर्च केले असताना तिला एक कस्टमर केअरचा नंबर सापडला. त्या नंबरवर फोन लावता तिला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.तिने त्याच प्रमाणेअ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तिला ओटीपी विचारण्यात आले. तिने ओटीपी सांगितल्यावर लगेच तिच्या बँकेच्या खात्यातून 11 लाख रुपये गेल्याचे समजले.सायबर गुन्हेगारांनी हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यातून 14 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2021 दरम्यान काढल्याचे त्यांना समजले.  तिने पोलिसांकडे जाऊन या सायबर फसवणूक झाल्याचे सांगितले. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायदाच्या अंतर्गत सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.