शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (20:44 IST)

मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णसंख्येला आता ब्रेक

This is good news for Mumbaikars
सातत्यान वाढणाऱ्या दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येला आता ब्रेक लागयला सुरुवात झाली आहे.  मुंबईत गुरुवारी 5 हजार 708 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज दिवसभरात एकूण 15 हजार 440 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका झाला आहे. तर कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर हा 84 दिवसांवर जाऊन ठेपला आहे. मुंबईतील कोरोनाचा दररोज घटणारा आकडा पाहता लवकरच निर्बंध शिथिल होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.