1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 10 मार्च 2023 (15:45 IST)

लोकलमध्ये हेल्मेट घालून प्रवास

Travel with helmet in local
मुख्यत: महाराष्ट्रात बाईक रायडिंगसाठी हेल्मेटचा वापर केला जातो. बाईकवर अपघाताच्या वेळेस सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर केला जातो.  बाईक चालवताना डोक्यावर हेल्मेट असेल आणि अपघात झाला तर डोक्याला गंभीर दुखापत होत नाही आणि जीव बचावतो. असं असलं तरी कित्येक बाईकस्वार ड्रायव्हिंग करताना हेल्मेट घालत नाही. पण एक तरुण सध्या चक्क मुंबई लोकल ट्रेनमध्ये हेल्मेट घालून फिरताना दिसतो आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
 
हेल्मेट घालून मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या या प्रवाशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकल ट्रेनमध्ये हा तरुण हेल्मेट घालून का फिरत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच व्हिडीओत या तरुणानं या प्रश्नाचं उत्तरही दिलं आहे. हेल्मेट घालून लोकल प्रवास का करत आहे, याचं कारण त्याने दिलं आहे. 
 
त्यानी सांगितले की सर्वात आधी आम्हाला स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यायला पाहिजे  मग ते बाईक असो व ट्रेन. या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आणि यावर बरेच कमेंट देखील येत आहे.