शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (15:43 IST)

मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणारे तुळशी तलाव ओव्हरफ्लो

मुंबई आणि शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस कोसळत आहे. या दमदार पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागला आहे.
 
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी तलाव हे एक आहे. सततच्या पावसामुळे तुळशी तलावातील पाणी काल रात्री ओसंडून वाहू लागले. मागील वर्षी तुळशी तलाव 9 जुलैला भरला होता. यंदा मात्र तलाव भरायला २८ जुलैचा दिवस उजाडावा लागला. तुळशी तलावाची पाणी साठवण्याची क्षमता 8046 दशलक्ष लिटर इतकीच आहे. मुंबई शहराला एका वर्षासाठी एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर दररोज 4500 दशलक्ष लिटरची गरज भासते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून 3900 दशलक्ष लिटर पाणी आणले जाते.