रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (15:14 IST)

उल्हासनगरातील वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह आढळला,हत्या की आत्महत्या?

उल्हासनगराच्या वालधुनी नदीत एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे.मृतदेह आढळल्याने अवघ्या परिसरात खळबळ उडाली आहे.मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही.मृत्यू हत्या आहे की आत्महत्या आहे हे देखील समजू शकले नाही.पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे.
 
गुरुवारी रात्रीच्या काळोख्यात वालधुनी नदीच्या जवळील रेल्वे स्थानकाच्या परिसरात बाजूस संजय गांधी परिसरात नदीच्या जवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने  खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी मृतदेह आढळल्यावर पोलिसांना कळवले.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.हा मृतदेह कोणाचा आहे.अद्याप ओळख पटू शकली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.