शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (15:40 IST)

शौचालयात पाणीपुरीचा स्टॉल Viral Video

Viral Video
वाशी- नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाशी रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतागृहात पाणीपुरीचा स्टॉल दिसत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सॉफ्ट ड्रिंक मशीन आणि त्यात पाणीपुरी भरतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे का होत असेल? असा सवाल नागरिकांनी केला असून अशाप्रकारे आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अशात प्रशासनाने यावर काय कारवाई केली पाहिजे असे नागरिकांना वाटत आहे. 
 
मुंबईकर आणि प्रवासी अनेकदा पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा स्टेशनवर ये-जा करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पाणीपुरीच्या स्टॉलवर गर्दी करतात. रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी हे चाट स्टॉल किंवा पाणीपुरीची दुकाने थाटली जात असली तरी आश्चर्याची बाब म्हणजे या गाड्या जाहिरातीच्या स्वरूपात रेल्वे स्थानकाच्या मुतारीमध्ये पाहायला मिळतात.