रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By विकास शिरपूरकर|

भैय्यांच्‍या रक्षणास 'संघ दक्ष'

राज्यात उत्तर भारतीयांवर होत असलेल्‍या हल्‍ल्‍याची कठोर शब्‍दात निंदा करतानाच राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने आपल्‍या स्वयंसेवकांना उत्तर भारतीयांच्‍या रक्षणासाठी पुढे येण्‍याचे आदेश दिले आहे. संघाकडून देण्‍यात आलेल्‍या या आदेशानंतर राज्‍यात शिवसेना आणि संघात वाद वाढण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहे.

या संदर्भात संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी सांगितले, की भाषा आणि प्रांताच्‍या नावावर वाद उभा करणा-या लोकांच्‍या मतांचे खंडन करणे गरजेचे आहे. आपल्‍या राजकीय स्‍वार्थासाठी दुस-या प्रांतातील लोकांवर हल्‍ले करणा-यांना संघ स्‍वयंसेवकांनी धडा शिकवावा. ते म्हणाले, की प्रत्येक भाषेचे स्‍वतःचे महत्‍व आणि आत्मसन्‍मान असून सर्व भाषांच्‍या स्वाभिमानाचे रक्षण करणे हे संघ कार्यकर्त्याचे कर्तव्‍य आहे.