सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

होय, देशात मोदींची लाट आहे

WD
कोणी काहीही म्हणो, मानो अथवा न मानो पण देशात आजच्या घडीला नरेंद्र मोदींचीच लाट आहे! हे वक्तव्य कुणा भाजप कार्यकत्र्याचे वा संघ स्वयंसेवकाचे नसून धर्मनिरपेक्ष विचारांशी जवळीक सांगणारे, भाजपचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे घनिष्ठ मित्र राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे आहे.

विश्वास ठेवणे कठीण असले तरी हे खरे आहे. लालूप्रसाद यांनी बिहारमधील मुस्लिमबहुल असलेल्या मिर्झापूर येथील जाहीर सभेत मोदींच्या लोकप्रियतेची कबुली दिली आहे. लालूंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

लालूंनी हे वक्तव्य नितीशकुमार यांना डिवचण्यासाठी किंवा मुस्लिमांमध्ये भाजप व मोदींबद्दल भीती निर्माण करण्यासाठी केले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नरेंद्र मोदींचा प्रभाव फक्त गुजरातमध्ये आहे, गुजरातबाहेर त्यांना कोणी विचारत नाही. मोदींमुळे भाजपला नुकसान होईल... असा प्रचार करणा-या काँग्रेसला ही सणसणीत चपराक मानली जात आहे.