मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2024 (15:42 IST)

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

India
पश्चिम बंगालची राजधानी मालदा येथे गुरुवारी वेगेवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृत पावलेल्या लोकांसाठी दुःख व्यक्त केले आहे. तसेच कुटुंबीयांप्रती भावना व्यक्त केल्या आहे. 
 
एका अधिकाराने सांगितले की, वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामुळे हे अपघात घडले आहे. या वीज अंगावर पडलेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  त्यांमधील काही लोकांची प्रकृती गंभीर जखमी आहे. जिल्हा प्रशासनने मृतकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन दोन लाखांची मदत करण्याची घोषणा केली आहे. 
 
पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये मणिचक क्षेत्रातील निवासी दोन अल्पवयीन मुले व मला ठाणे क्षेत्रातील साहापूर मधील तीन लोक होते. हरिश्चंद्र पूर मध्ये शेतात काम करणाऱ्या एका दांपत्यावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन लोक गजोल आणि आदीना, रतुआ क्षेत्रातील बालूपूर येथील राहणारे आहेत.