1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (15:36 IST)

गोव्यात BITS Pilani चे 24 विद्यार्थी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, ऑफलाइन क्लासेस बंद

24 BITS Pilani student corona positive in Goa
पणजी- गोव्यात कोरोनाचे नवीन प्रकरण आल्यामुळे सर्व हैराण आहे. बिट्स पिलानी (BITS Pilani) इंजीनियरिंग परिसरात कोरोनाचे 24 नवीन प्रकरणं समोर आले आहेत. संक्रमित होणारे र्स विद्यार्थी आहे. यानंतर दक्षिण गोव्याचे जिल्हा प्रशासन कॉलेजचे सर्व शिक्षका आणि विद्यार्थ्यांचा कोरोना टेस्‍ट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
 
वास्‍को डिप्‍टी कलेक्‍टर दत्‍तारात देसाई यांनी सांगितले की गोव्याच्या जुआरीनगर स्‍थि‍त बिट्स पिलानी कँपसमध्ये 24 विद्यार्थी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. कॉलेज बंद केले गेले आहे. आता ऑनलाइन अभ्यास होईल. इतरांची टेस्ट केली जात आहे.
 
या व्यतिरिक्त कॉलेज कँपसमध्ये कोणालाही येण्याची परवानगी नाही. संक्रमितांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी केली जाईल. जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करत म्हटले आहे की कँपसमध्ये बस इमरजेंसी सेवेला परवानगी देण्यात आली आहे. सर्वांना मास्क वापरणे अनिवार्य केले गेले आहे. पुढील 15 दिवस क्‍लास ऑनलाइन राहतील.