रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (10:47 IST)

कानपूर महामार्गावर एर्टिगाला ट्रकची धडक, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

accident
इटावा-कानपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला एर्टिगा कार धडकली. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाच्या झोपेमुळे हा अपघात झाला. हे कुटुंब दिल्लीहून हमीरपूरला जात होते.
 
हा अपघात कानपूर हायवेवर इटावामधील इकदिल येथे झाला. हे कुटुंब दिल्लीहून हमीरपूरला जात असताना इटावा-कानपूर महामार्गावर सकाळी कार चालकाला झोप लागली, त्यामुळे इर्टिगा कार जवळच उभ्या असलेल्या ट्रकला धडकली.  
 
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढले. या अपघातात एक महिला आणि तीन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मृतदेह व जखमींना बाहेर काढले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले .

Edited By- Dhanashri Naik