गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (12:05 IST)

ओडिशातील विमानतळावरून 87 किलो सोने आणि 100 किलो चांदी जप्त

odisha
ओडिशाच्या विमानतळावरून व्यावसायिक कर आणि वस्तुसेवाकर विभागाने मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी जप्त केली आहे. हे सोने आणि चांदी 2 कंटेनरमधून जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सोने आणि चांदी पाहून अधिकारी देखील अवाक झाले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. 

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये बिजुपटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी जप्त केली आहे. सोन्याच्या पाकिटाचे वजन 87 किलोहून जास्त असण्याची शक्यता आहे. तर चांदी 100 किलोपेक्षा जास्त आहे. बाजारात याची किंमत 30 कोटीहून जास्त असू शकते. 

ही खेप इंडिगो आणि विस्तारा विमानाने भुवनेश्वरला आणली होती. हे सोन्या-चांदीचे दागिने पेटीत ठेवण्यात आले होते. योग्य बिलाविना माल आढळल्यास जीएसटी कायदा व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
Edited by - Priya Dixit