गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (09:59 IST)

धक्कादायक पाचगणीत पॅराग्लायडिंग करत असताना पर्यटकाचा मृत्यू

सातारा येथील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असेलल्या पाचगणीमध्ये परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना घडली असून, पाचगणीच्या टेबल लॅन्डवरुन पॅराग्लायडिंग करत असताना या पर्यटकाचा मृत्यू झाला. पॅराग्लायडिंग करताना झाडावर धडकल्यामुळे या पर्यटकाचा मृत्यू झाला. सॅन टेक ओ असं या परदेशी पर्यकाचे नाव आहे. भारतातील मुंबईमध्ये सहकाऱ्यांसोबत सॅन टेक ओ फिरायला आला होता. मुंबईतून तो पुढील ५ दिवसासाठी साताऱ्यामध्ये फिरायला आला, कोरियामधून एक पॅराग्लायडिंग करणारा ग्रुप गेल्या काही दिवसापासून वाई-महाबळेश्वर येथे मुक्कामी आहे. त्यामध्ये सॅन टेक ओ देखील होता. वाईजवळ खाजगी पद्धतीनं पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवला जातो. सॅनही त्याच्या मित्रांसोबत पॅराग्लायडिंग करण्यासाठी आला होता. यावेळी जवळपास १२० लोक पॅराग्लायडिंगसाठी जमले,त्यांच्यासोबत पाचगणीच्या टेकड्यांवरून सॅननंही पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केलं. मात्र, पॅराग्लायडिंग करताना सॅन बेपत्ता झाला. त्याचा शोध सुरु केला असता रात्री उशीरा अभेपुरी गावाजवळच्या टेकडीवर त्याचा मृतदेह सापडला आहे. या मुळे येथील पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे. तर पुन्हा एकदा सुरक्षा प्रश्न समोर उभा राहिला आहे.