1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (17:30 IST)

आंध्र प्रदेशात पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळली, 10 जणांचा जागीच मृत्यू

A bus full of tourists fell into a ravine in Andhra Pradesh
आंध्र प्रदेशात एक भीषण अपघात झाला  असून त्यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील  अल्लुरी सीताराम राजू (एएसआर) जिल्ह्यात बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.
 
आंध्र प्रदेशात एका टेकडीवरून पर्यटकांची बस कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला. अल्लुरी सीताराम राजू (एएसआर) जिल्ह्यातील वांजंगी येथे ही घटना घडली. एएनआयच्या वृत्तानुसार, बस विशाखापट्टणमहून पडेरूकडे जात असताना ही घटना घडली.दहा जणांना जीव गमवावा लागला आहे, तर सर्व जखमी प्रवाशांना स्थानिक लोकांनी वाचवले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
Edited By - Priya Dixit