शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 2 जानेवारी 2020 (12:12 IST)

नवी दिल्लीतील कारखान्यात आग, अनेक जण अडकले

A fire in a factory in New Delhi has left many trapped
येथील पीराग्रही येथे कारखान्याला भीषण आग लागून स्फोट झाला आहे. स्फोटाच्या धमाक्याने इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये ३० गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील पिरागढी परिसरातील इमारतीत बॅटरीचा कारखाना आहे. इमारतीमध्ये काही रहिवासी आणि कारखान्यातील काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
 
बचावकार्यासाठी एनडीआरएफच टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. बॅटरी कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या इमारती खाली करण्यात आल्या आहेत. बॅटरी कारखान्यात केमिकल असल्याने आग सतत वाढत आहे.  
 
मात्र आग आटोक्यात आणण्याते प्रयत्न सुरु असताना तेथे स्फोट झाला. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांसह काही जण अडकले. अग्निशमनदलाच्या ३५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.