1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (13:10 IST)

गुजरातमधील अरवली येथील रासायनिक कारखान्याला भीषण आग

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एका केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. केमिकल फॅक्टरीला लागलेल्या आगीत 60 हून अधिक टँकर जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अरवली जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात आज सकाळी आग लागली. केमिकल फॅक्टरीला लागलेली आग इतकी भीषण आहे की त्याच्या ज्वाळा दूरवर दिसत आहेत.
 
कारखान्यात ठेवलेले केमिकलने भरलेले ६० हून अधिक टँकर जळून खाक झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. या प्रकरणी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
 
आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ज्वाला आकाशात उठताना दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 
 
आगीत जळून खाक झालेले टँकरही दिसले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले असून हलका धूरही उठताना दिसत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit