रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जून 2024 (15:14 IST)

छोटाश्या कारणावरून रिक्षाचालकाला मारहाण करून नंतर हत्या, तीन आरोपींना अटक

उत्तर प्रदेशमधील रिक्षा चालकाला मारहाण करून त्याची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार छोट्याश्या कारणावरून रिक्षा चालक आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. यामुळे या तीन आरोपींनी रिक्षा चालकाला मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 
 
उत्तर प्रदेशमधील उन्नाव मध्ये रिक्षा चालकला मारहाण केल्याची बातमी समोर आला आहे. सर्व आरोपी हा गुन्हा करून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचहा शोध घेऊन त्यांना अटक केली. 
 
चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की, रिक्षा चालक आणि आरोपींमध्ये साधारण गोष्टीवरून वाद झाला. व या आरोपींनी या रिक्षा चालकाला मारहाण केली. व परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या आरोपींना अटक केली व कोर्टात हजर केले त्यानंतर त्यांना जेल मध्ये पाठवण्यात आले आहे. 

Edited By- Dhanashri Naik