1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (16:29 IST)

लडाखमध्ये एकूण ३० हजार जवान तैनात

A total of 30
भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान प्रांतात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधले संबंध बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लडाखमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात केलं आहे. लडाखमध्ये एकूण ३० हजार जवानांना तैनात करण्यात आले आहेत.यएएनएसच्या माहितीनुसार एलएसी जवळ सामान्य परिस्थितीत ६ ब्रिगेड म्हणजेच २ डिविजन तैनात केल्या जातात. मात्र, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ३ डिविजन तैनात करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून एलएसीवर जवळपास १० हजार जवान तैनात करण्यात आले आहे.  याशिवाय २०१७ साली भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅरा स्पेशल फोर्सेसला देखील लडाखमध्ये पाठवण्यात आलं आहे.