शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (13:06 IST)

मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोपी रेल्वे ट्रॅकवर मृत आढळला, मंत्र्यांनी एन्काउंटरची घोषणा केली होती

हैदराबादमध्ये 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोपी रेल्वे ट्रॅकवर मृत आढळला आहे. तेलंगणा पोलिसांच्या डीजीपीने मृत व्यक्तीच्या टॅटूच्या खुणा आणि शरीरावर सापडलेल्या इतर ओळखीवरून आरोपीची पुष्टी केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मुलीवर झालेल्या जघन्य गुन्ह्याबद्दल राज्यात खळबळ उडाली होती आणि राज्यमंत्रयांनी आरोपी सापडल्यावर एन्काउंटर करण्याचे विधान देखील केले होते.
 
तेलंगणा पोलिसांच्या डीजीपीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एका ट्विटमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, 'मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोपी रेल्वे ट्रॅकवर मृत आढळला. ही जागा घनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मृताच्या शरीरावर सापडलेल्या खुणावरून ओळख पटली आहे. ट्रॅकच्या मध्यभागी पडलेल्या मृतदेहाची चित्रे देखील शेअर केली गेली.