शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 26 मार्च 2018 (12:26 IST)

पाकच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर हाच पर्याय : शहा

पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि वाढत्या कारवाया लक्षात घेता आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे हाच एक पर्याय उरला आहे, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अतिम शहा यांनी नोंदवले आहे. मागील काही दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढले आहे.
 
पाकिस्तानला भारतीय सैन्याकडूनही जशास तसे उत्तर दिले जाते आहे. तरीही कारवाया थांबण्याचे प्रमाण कमी  झालेले नाही. त्यासंबंधीचा प्रश्न पत्रकारांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांना विचारला. त्यावर उत्तर देताना आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर देणे हाच पर्याय आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.
 
सर्जिकल स्ट्राइक केला तरीही त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. भारताविरोधात पाकिस्तानच्या कारवाया थांबताना दिसत नाहीत. पाकिस्तान अजूनही भारतात दहशतवादी पाठवत आहे. त्यांच्या गोळ्यामुंळे निष्पाप लोकही मारले जात आहेत. हे आता कदापि सहन केले जाणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
 
येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत विचारले असता, येत्या निवडणुकांध्ये भाजपचाच विजय होणार आहे, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकांध्ये भाजपचाच विजय होईल आणि पंतप्रधानपदी पुन्हा मोदी विराजमान होतील, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
 
2019 मध्ये भाजपला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मंदिरांच्या भेटीवरही अतिम शहा यांनी टीका केली. गुजरात आणि हिमाचल या ठिकाणच्या मंदिरांना राहुल गांधींनी भेटी दिल्या. मात्र काय झाले, हे तुम्ही पाहिलेच आहे. राहुल गांधी यांनी आणि त्यांच्या गांधी घराण्यानेदेशासाठी काहीही केले नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ साधला, अशीही टीका शहा यांनी केली. एवढेच नाही तर 2019 च्या निवडणुकांमध्ये भाजपला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळणार, असेही त्यांनी म्हटले आहे.