मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2023 (12:24 IST)

Army Chopper Crash जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, दोन जखमी

Army Chopper Crash in Kishtwar
Army Chopper Crash जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये भारतीय लष्कराचे तीन अधिकारी होते. बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. जिथे हेलिकॉप्टर कोसळले, तो किश्तवाडचा दुर्गम भाग आहे. दोन-तीन दिवसांपासून येथे पाऊस पडत आहे.
 
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे ALH ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून ते चिनाब नदीत पडले आहे. या अपघातात दोन पायलट जखमी झाले असले तरी ते सुखरूप आहेत.
 
बातमी अपडेट केली जात आहेत.