शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2017 (11:02 IST)

केजरीवालांना दहा हजारांचा दंड

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केजरीवालांविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. यावर नेमून दिलेल्या वेळेत स्पष्टीकरण न दिल्यामुळे न्यायालयाने त्यांना दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. तत्पूर्वी मानहानी खटल्यातील उलटतपासणी दरम्यान अरूण जेटली यांना आक्षेपार्ह प्रश्न विचारू, असेही न्यायालयाने केजरीवाल यांना बजावले. उलटतपासणी करताना कायद्याला अपेक्षित असलेली प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेचा वापर करण्याची परवानगी नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी आपण केजरीवाल यांचे वकीलपत्र सोडत असल्याचे जाहीर केले होते. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना यासंबंधी पत्र लिहून आपण हा खटला लढणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच या खटल्याचे २ कोटी रुपयांहून अधिक शुल्क अदा करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.