शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सिंदखेडराजा , शनिवार, 13 जानेवारी 2018 (13:23 IST)

भाजप, संघानेच दंगल घडवली : केजरीवाल

arvind kejariwal
दोन समाजांत भांडणे लावून राजकारण करण्याची भाजपमध्ये पद्धत आहे. भाजपचा इतिहास दंगलीचा आहे. भीमा कोरेगाव येथे देखील भाजप आणि आरएसएसने दंगल घडवून आणली, असा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रुख अरविंद केजरीवाल यांनी केला. 
 
सिंदखेडराजा येथे आपच्या 'महाराष्ट्र संकल्प' सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढील वर्षी होणार्‍या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले.
 
भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका करताना केजरीवाल म्हणाले, फोडा आणि राज्य करा अशी नीती वापरत इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली. भारतातील शांतता भंग करण्याचे पाकिस्तानने 70 वर्षापासूनचे स्वप्न भाजपने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले आहे.
 
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच अशी घोषणा यावेळी 'आप'कडून करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा दिल्ली सरकारने उचलला आहे.