गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (22:19 IST)

आर्यन खानची आजची रात्रही आर्थर रोड तूरूंगातचं

Aryan Khan
कूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला गुरूवारी हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. कागद पत्रांच्या पुर्ततेमुळे आज सायंकाळी तो जेलबाहेर येणार होता. मात्र जामीनासाठी लागणारे कागदपत्रे वेळेत पोहोचले नसल्याने आज आर्यनची सुटका होणार नाही. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही आर्थर रोड तूरूंगातचं जाणार आहे.
 
जामीनासाठी लागणारे कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे आज आर्यनची सुटका होणार नाही. ऑर्थर रोड जेल प्रशासनाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आर्यनला आजची देखील रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे. आर्यन खान आज ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडणार नाही. कुणासाठीही नियम बदलणार नाही. जामीनासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रपेटी आम्ही उघडलेली होती. पण तिथे आर्यनच्या जामीना संबंधित कोणतेही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे आर्यनची आज जेलमधून सुटका होणार नाही, अशी माहिती ऑर्थर रोड जेलकडून देण्यात आली आहे.