1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (15:59 IST)

भारतीय मुस्लिम व्यक्तींना 'पाकिस्तानी' संबोधणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा द्या

indian muslim
भाजपच्या वाचाल विरांमुळे अनेकदा नको ते वाद सुरु होता. भाजपाच्या एका आमदाराने भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानात जावे असे म्हटले होते. अयावर आता ओवेसी मैदानात उतरले आहेत. भारतीय मुस्लिम व्यक्तींना 'पाकिस्तानी' संबोधणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. यासंदर्भात कायदा करण्याची मागणी ओवेसींनी संसदेत केली आहे.  भारतात राहणाऱ्या मुसलमानांना पाकिस्तानी म्हटल्याबद्दल दोषी आढळणाऱ्या व्यक्तींना तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावली जावी,  भाजप सरकार असा कायदा आणणार नाही, असा टोलाही ओवेसींनी लगावला आहे. तर दुसरीकडे आपल्या भाषणात केंद्राने मांडलेलं तिहेरी तलाक विधेयक हे महिलांविरोधी असल्याचा दावाही ओवेसींनी केला आहे.