testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एटीएम : कितीही वेळा काढा विना शुल्क पैसे

Last Modified शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (09:58 IST)
दोन प्रकारच्या नोटा बंद नंतर देशभरातील सर्वच
एटीएम मशिन्स दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र अनेक वर्ष
फायदेशीर ठरणारा हा निर्णय घेताना सुरुवातीच्या काळात काही अडचणी किंवा गैरसोयींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे असे केंद्राने अनेकदा स्पष्ट केले होते.
तर यावर उपचार म्हणून आणि सामान्य माणसाला फायदा व्हावा या करिता याचसाठी 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना ग्राहकांना एटीएममधून कितीही वेळा पैसे काढता येणार आहेत.

सध्या तरी रोज एका ग्राहकास जास्तीत जास्त दोन हजार रुपयांची रक्कमच एका दिवशी काढता येईल. तर दुसरी कडे महिन्याला एटीएममधून मोफत ट्रान्झॅक्शन करण्यावर बंधन असल्यामुळे अनेकांना अतिरिक्त शुल्क द्यावं लागण्याची भीती सतावत होती. परंतु आता ही चिंता दूर झाली आहे. यावर आरबीआय ने आणि केंद्राने दिलेल्या माहितीनुसार कोणतीही बँक अतिरिक्त शूल्क आकारणार नाही.


यावर अधिक वाचा :