testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 'आधार' सक्ती

नवी दिल्ली| Last Updated: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (12:27 IST)
आधार कार्डची सक्ती आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही करण्यात आली आहे. पटना विद्यापीठातील मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पीएचडी करणाऱ्यांसाठी हे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत दिले आहे. विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचे विद्यापीठाच्या उपकुलगुरु डॉली सिन्हांनी दिली. या कार्यक्रमाला केवळ पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि पीएचडी करणारे विद्यार्थीच उपस्थित राहू शकतात. त्यासाठीही त्यांना आधार कार्ड दाखवावे लागेल. विद्यार्थी संघटनेशी संबंधित असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींसमोर एखादा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून ही काळजी घेतली जात आहे. याशिवाय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मर्यादित विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी एनसीसी किंवा एनएसएसशी संबंधित असल्यास त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल.


यावर अधिक वाचा :