testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रकटले बाबा बर्फानी

काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू होत असून यंदा भाविकांना गतवर्षीपेक्षाही मोठे शिवलिंग पाहण्याचा योग येणार आहे. गुहेत यंदा बाबा बर्फानी म्हणजेच अमरनाथ पार्वतीसह प्रकटले असून हे शिवलिंग पूर्ण उंचीचे तयार झाले आहे.
गुहेत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले असून ते सोळा मीडियावर व्हायरल झाले आहे. यंदा 1 लाखांहून अधिक भाविकांनी या यात्रेसाठी नोंदणी केली आहे. अशा दोन मार्गांनी भाविक गुहेकडे जाऊ शकणार आहेत. ही यात्रा 7 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे व यात्रेवर दहशतवादी हल्ल्यांचे सावट आहे. हे लक्षात घेऊन शनिवारी जम्मू येथे सुरक्षारक्षक प्रमुखांची बैठक घेण्यात आली व त्यात सुरक्षेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली गेल्याचे समजते.
आणीबाणी ओढवलीच तर भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदा 30 हजार जवान तैनात केले गेले आहेत. गांदरबल जिल्ह्यात मॉक ड्रीलही घेतल्या गेल्या आहेत.


यावर अधिक वाचा :