1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 23 जानेवारी 2022 (14:26 IST)

बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यामधून वगळलं महात्मा गांधींचं आवडतं भजन

Beating the Retreat 'is a favorite hymn of Mahatma Gandhi बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यामधून वगळलं महात्मा गांधींचं आवडतं भजनMarathi National News  In Webdunia Marathi
अमर जवान ज्योतीच्या वादानंतर केंद्र सरकारनं केलेल्या आणखी एका बदलाची सध्या चर्चा सुरू आहे. ते म्हणजे 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यातून महात्मा गांधींची आवडतं ख्रिस्ती भजन वगळल्याचा प्रकार.
 
प्रजासत्ताक दिनानंतर 29 जानेवारील होणाऱ्या बीटिंग द रिट्रीट सोहळ्यात वाजवल्या जाणाऱ्या धूनमध्ये महात्मा गांधींचं आवडतं 'अबाइड विद मी' हे गीतही असतं. पण यावर्षी हे गीत हटवण्यात आलं आहे.
 
हे गीत यापूर्वीही काढून टाकण्यात आलं होतं. 2020 मध्ये हे गीत सोहळ्यातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर झालेल्या वादानंतर 2021 मध्ये पुन्हा या गीताचा समावेश करण्यात आला होता.
 
केंद्र सरकारनं यावर्षीपासून प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्येही बदल केले आहेत. त्यात एक दिवस आधी 23 जानेवारीपासून म्हणजे सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीपासून सोहळ्याला सुरुवात होणार आहे.