शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑगस्ट 2017 (09:01 IST)

बिहार मध्ये भीषण पूर

bihar flood

बिहारमध्ये  पावसामुळे बिहारमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाची हवाई पाहणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदीही त्यांच्यासोबत होते. 

 मोदींनी पूर्णिया जिल्ह्यात वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला.    बिहारला तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.  सर्व सहकार्य करु तसेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रातून पथक पाठवण्याचेही त्यांनी सांगितले आहे.पूरामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी आणि कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहेत.  आसाम,उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालला  पूराचा मोठा फटका बसला आहे. आसाममध्ये २१ जिल्ह्यातील २२.५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.