testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक

Last Modified शनिवार, 15 एप्रिल 2017 (12:12 IST)

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक शनिवार पासून भुवनेश्वर येथे सुरू होत आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री, भाजपशासित 13 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 3 उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकांत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, बैठक स्थळाला संत कवी भीमाजी भोई यांचे नाव देण्यात आले आहे. ओडिशा राज्याच्या लोकसंख्येत दलितांचे प्रमाण 17 टक्के इतके आहे. त्यामुळे दलितांना आपलेसे करण्यासाठी भाजपने बैठकस्थळासाठी हे नाव निवडल्याचे मानले जात आहे.यावर अधिक वाचा :