गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (17:06 IST)

#BlockNarendraModi जोरात ट्रेण्ड सुरु

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील सर्वाधिक फॉलोअर्सपैकी एक आहेत. मात्र आता अनेकजण तातडीने अनफॉलो करत आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर, #BlockNarendraModi ही मोहीम चालवली जात आहे.  टोकाची भाषा वापरुन ट्रोल करणाऱ्यांना विरोध म्हणून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर निखिल दधीच यांच्या @nikhildadhich या ट्विटर हॅण्डलवरुन, वादग्रस्त ट्विट करण्यात आलं होतं. मात्र याच ट्विटरला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर #BlockNarendraModi या मोहिमेने उचल घेतली. काही लोकांनी नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटला ब्लॉक करुन, त्याचे स्क्रीन शॉट ट्विट केले. त्यानंतर ही मोहिम वाढत जाऊन पुढे ट्रेण्ड बनली.