देशात बॉम्बच्या धमक्या वाढत आहेत, आतापर्यंत शाळा, विमानतळ आणि आरबीआयला टार्गेट केले
अलीकडे देशातील अनेक शाळा, विमानतळे आणि रेल्वे स्थानकांना बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या आहे. या प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील अनेक शाळांना धमक्या मिळाल्याची माहिती समोर आली असून आता आरबीआयला देखील धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे.
गुरुवारी आरबीआयला धमकीचा मेल आला होता. ज्याची माहिती आज शुक्रवारी समोर आली आहे. धमकीचा हा मेल गुरुवारी दुपारी आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आला होता. त्याची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाली आहे. हा धमकीचा ईमेल रशियन भाषेत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरबीआयला आलेल्या या ईमेल मध्ये रशियन भाषेत रिझर्व बँक बॉम्बने उडवून दिल्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अशा धमक्यांमुळे समाजात दहशतीचे वातावरण पसरले आहे.यावर पोलीसही अलर्ट मोडवर आले असून या मेलमागे लपलेल्या आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्लीतही मुलांना आणि त्यांच्या पालकांना शाळांमध्ये अडचणी येत असून आता मुलांना शाळेत पाठवण्याची भीती वाटत आहे. अशा स्थितीत प्रशासनाचीही चिंता वाढली आहे
Edited By - Priya Dixit