बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जानेवारी 2019 (16:59 IST)

मुंबईत बिल्डरची आत्महत्या

मुंबईतील चेंबुर परिसरातील बिल्डरने आत्महत्या केली आहे. संजय अग्रवाल असे बिल्डरचे नाव आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वत:वर गोळ्या झाडून बिल्डर संजय अग्रवाल यांनी आत्महत्या केली.
 
बिल्डर संजय अग्रवाल यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. चेंबुर पोलिस ठाण्यात या आत्महत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. बिल्डर संजय अग्रवाल यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे, हे आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल.