रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (10:18 IST)

देशातील 56 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मुख्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, नागालँड तसेच मणिपूरसह विविध राज्यातील 56 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबरला मतदार प्रक्रिया पार पडेल, 10 नोव्हेंबरला मतमोजणी होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, बिहारमधील वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघात 7 नोव्हेंबरला पोटनिवडणूक घेणत येणार आहे. या राज्यात पोटनिवडणूक मध्य प्रदेशातील सर्वाधिक 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार  आहे. मध्य प्रदेशासह गुजरात (8), उत्तरप्रदेश (7), ओडिशा, नागालँड, मणिपूर, झारखंड, कर्नाटकमधील प्रत्येकी 2 जागांवर, तर छत्तीसगड, हरियाणा आणि तेलंगणातील प्रत्येकी एका विधानसभा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.