गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पाक ध्वजांकित शर्ट घालणार्‍या 11 तरुणांविरुद्ध राजद्रोहाचा मामला दाखल

धनबाद- झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात पाकिस्तानी झेंडा अंकित शर्ट घालणार्‍या 11 तरुणांचा कथित फोटो मीडियावर दाखवल्यानंतर त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा मामला दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिस अधीक्षक अमन कुमार यांनी सांगितले की ग्रुप फोटोमध्ये संदिग्ध रूपात दिसत असलेल्या पाच तरुणांना अटक केली गेली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तरुणांबद्दल माहिती देण्यास नकार दिला आहे.
 
कुमार यांनी म्हटले की जिल्हा प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी बैद्यपुर गावात तेव्हा कलम 144 लागू केली जेव्हा पाक ध्वजांकित शर्ट घातलेल्या तरुणांच्या फोटोमुळे ताण निर्माण झाला. एसपी यांच्याप्रमाणे आता स्थिती नियंत्रणात आहे.
 
एसपी यांनी म्हटले की पाकिस्तानमध्ये जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरावर भारतीय हवाई हल्ल्याचा जश्न साजरा करत असलेल्या निरसा ब्लॉकच्या लोकांनी सोशल मीडियावर काही स्थानिक तरुणांचे फोटो बघितले. लोकांनी मंगळवारी संध्याकाळी 11 तरुणांच्या घरी पोहचून तोडफोड केली. पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.